मुंबई

‘साम, दाम, दंड भेदचा वापर करा’

मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकविली

पालघरमध्ये शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी दावा केला आहे. या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये केली.

काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता… आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?

ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे

ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा…
साम, दाम, दंड, भेद…
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
‘अरे ला कारे’च करायचं..
‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी केली आहे. यासंदर्भात भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close