पुणे

लिटिल मिलेनियम तर्फे पुण्यात टीचर्स ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न

पुणे : आघाडीची प्रि स्कुल असलेल्या लिटील मिलेनियम तर्फे नुकतेच पुण्यात टीचर्स ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा कोंढवा कात्रज रस्त्यावरील कमल नयन बजाज अतिथी भवन,इस्कॉन टेंपल येथे पार पडली.ही कार्यशाळा लिटील एज्युकेशन प्रा.लि.च्या  अ‍ॅकॅडेमिक्स आणि ट्रेनिंग्स विभागाच्या संचालिका मंजित लेघा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेअंतर्गत 400 हून अधिक शिक्षकांना त्यांची कौशल्ये व जागतिकदृष्ट्या सर्वोत्कष्ट पध्दतींसह तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close