मनोरंजन

रोडीज रियल हिरोज च्या माध्यमातून एमटीव्ही तर्फे आता साहस आणि वीररस एकत्र आणले जाणार

रोडीज रियल हिरोज च्या माध्यमातून एमटीव्ही तर्फे आता साहस आणि वीररस एकत्र आणले जाणार

पुणे : भारतीय टेलिव्हिजन वरील सर्वाधिक काळ चालणारा साहसी रिअॅलिटी शो असलेला एमटीव्ही रोडीज आता आपले सोळावे पर्व सुरू करत असून रोडीज रियल हिरोजची सुरूवात १० फेब्रुवारी संध्याकाळी ७.०० वाजता एमटिव्ही वर होणार आहे. या नवीन सिझन मध्ये आता सर्व प्रेक्षकांना अनोखा अनुभव मिळणार आहे. रोडीज फेम रणविजय सिंघा पुन्हा एकदा सूत्रसंचालक आणि रिंग मास्टर म्हणून काम पाहणार असून त्यामुळॆ प्रत्येक स्तरावर नवीन ट्वीस्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. तर नेहा धुपिया, प्रिन्स नरूला, निखिल चिन्नप्पा आणि रफ्तार आपल्या टिम्सचे नेतृत्व करून १६ व्या पर्वांत आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. इतकेच नव्हे तर स्पर्धा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय हॉकी टिमचा माजी कप्तान संदीप सिंग सुध्दा आपली एक टिम घेऊन रोडीज रियल हिरोजच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.


या शो ने भारतीय तरूणाईमध्ये असलेली साहसाची परिभाषा बदलली असून त्याचबरोबर धैर्य आणि साहसाने युक्त असलेल्या देशभरांतील रिअल लाईफ हिरोज असलेल्या स्पर्धकांना या सिझन मध्ये आकर्षित केले आहे.रोडीज रीअल हीरोज हे त्यांच्या कौशल्याने युक्त गुणधर्मांकडे लक्ष देतात आणि धैर्य, साहस आणि उत्कटतेचे परिपूर्ण मिश्रण प्रदान करतात.

सोळाव्या सिझनसाठी उत्साही असलेला रणविजय म्हणतो‘‘सर्वांत अधिक काळ चालणाऱ्या रिअॅलिटी शो चा भाग होतांना आंम्हाला आनंद होत आहे. मी या शो मध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झालो, नंतर गॅंग लीडर आणि आता सलग दोन वर्ष मी मास्टर आहे म्हणजेच मला या सर्वांचा चांगला अनुभव आहे. या सिझनचा विषय पाहता मी अधिक उत्साही आहे कारण याधून मला देशभरांतील खऱ्या हिरोज च्या शक्तीचा अनुभव मिळेल व यांतील सर्वोत्कृष्‍ट जिंकेल.’’

सौंदर्यवती व दोन वेळची विजेती नेहा धुपिया म्हणते‘‘रोडीज हा तरूणाईला एकत्र आणून त्यांच्यातील सर्वोत्कृष्‍ट बाहेर आणण्याचा एक सुंदर मंच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर टिमवर्क,साहस,नाट्य आणि आनंद आहे. प्रत्येक सिझन मध्ये स्पर्धकांना अधिक चांगले मिळत असते. मी सुध्दा या सिझन ने खूपच उत्साही आहे कारण संदीप सिंग आमच्या बरोबर येत असल्याने व रियल हिरोज बरोबर मंच शेअर करत आहे. कारण या हिरोज नी त्यांच्या आयुष्यात निस्वार्थ आणि चांगले काम केले आहे.’’
प्रतिथयश खेळाडू संदीप सिंग म्हणतो‘‘रोडीज सारख्या तरूणाईला आकर्षित करणाऱ्या एमटीव्ही रोडीज बरोबर सहकार्य करणे आनंदाची बाब आहे. या सहकार्या बरोबरच आपल्यासाठी एक प्रोत्साहक विषयही प्राप्त होत आहे. मी सध्याच्या गॅंग लीडर्सना आव्हान देण्यासाठी आलो असून या प्रवासाचा नक्कीच आनंद घेऊ शकेन.’’


प्रसिध्द एमटीव्ही होस्ट आणि व्हीजे निखिल चिन्नप्पा म्हणतो‘‘प्रत्येक सिझन पुढे जातांना आम्ही रोडीज मध्ये अधिक कठीणता आणि साहस आणत आहोत. यामुळे फॅन्सना सुध्दा आश्चर्य वाटते व शो अधिक उंचीवर जात आहे. हे सातत्य राखत आम्हाला रोडीजचा सोळावा सिझन आणतांना आनंद होत आहे. प्रेक्षकांनी दिलेले प्रेम पाहून आंम्हाला नेहमीच प्रत्येक सिझन अधिक आकर्षक आणि मनोरंजक करण्याचे प्रोत्साहन मिळत आहे. मला खात्री आहे की रोडीज रिअल हिरोजला ही लोकांचा असाच चांगला प्रतिसाद मिळेल.’’

टेलिव्ह‍िजन वरील प्रसिध्द चेहेरा प्रिन्स नरूला म्हणतो‘‘रोडीज सारख्या महत्त्वपूर्ण व अधिक मोठ्या प्रमाणावर फॅन्स असलेल्या कार्यक्रमाचा गॅंग लीडर बनणे आमच्यासाठी भाग्याची गोष्‍ट आहे. एक विजेता बनल्यानंतर आणि एक गॅंग लीडर म्हणून मी आता रिअल लाईफ हिरोज चा अनुभव घेऊन माझ्या गॅंग मेंबर्स बरोबर जिकण्यासाठी मी आलो आहे. हा प्रवास खूपच संस्मरणीय असेल अशी मी आशा करतो.’’

किंग ऑफ रॅप आणि गॅंग लीडर रफ्तार म्हणतो‘‘ एक गॅंग लीडर म्हणून माझी ही दुसरी इनिंग आहे आणि या शो बद्दल मी खूपच उत्साही आहे. रोडीज म्हणजे आपली शक्ती वाढवणे व आरामापेक्षा अधिक काहीतरी करणे. सर्व गॅंग लीडर्स आणि गॅंग मास्टर रणविजय खरोखरच हा सिझन काहीतरी विशेष करण्यावर जोर देत आहेत. विशेष असा हा विषय आहे आणि आयकॉनिक संदीप सिंग आमच्या बरोबर जोडला जात आहे, आता आम्ही एक कुटूंब आहोत आणि या सहकार्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही अधिक बळकट होत आहोत.’’

या सिझनचे शुटिंग हे दक्षिण भारतातील कन्नन पर्वतराजीतील मुन्नारच्या देवन पर्वतराजीत करण्यात आले असून पश्च‍िम घाटातील चिकमंगळूर येथील मुल्यनगिरी या सर्वोच्च शिखरावर करण्यात आलेले आहे. यामध्ये स्पर्धक केवळ त्यांच्या भिती बरोबरच मुकाबला करणार नाहीत तर येथील अतिशय कठीण अशा हवामानाशीही मुकाबला करणार आहेत व कठीण अशा टास्कही पूर्ण करणार आहेत. साहसाची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक रोलर कोस्टर राईड असेल व जीवनभराचा एक अनुभव ठरणार आहे.
रोडीज रियल हिरोज ची सुरूवात ही १० फेब्रुवारी रोजी संध्या. ७.०० वाजता एमटीव्ही वर पहा.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close