टेक्नोलॉजी

या साध्या टिप्स वापरून तुमची त्वचा आणि केसांना ठेवा होळीच्या त्रासापासून दूर!

या साध्या टिप्स वापरून तुमची त्वचा आणि केसांना ठेवा होळीच्या त्रासापासून दूर!

रंगांचा सण आता अगदी समीप आला आहे. सुका गुलाल आणि पाण्यासोबतच काही प्रमाणात सिंथेटिक रंगही असतीलच. ते तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकतात. तुम्ही अगदी ऑरगॅनिक रंग वापरत असलात तरी सूर्यप्रकाशात आणि रंगांच्या पाण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. पण, काळजी करू नका, अॅमेझॉन ब्युटीच्या कंटेंट लीड सोबिया मुघल यांनी काही टिप्स आणि युक्त्या सांगितल्या आहेत, ज्यामुळे होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील!

एसपीएफएसपीएफ किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या लोशनचे संरक्षण तुमच्या त्वचेला द्या. त्यामुळे त्वचा मॉईश्चराइज होईल आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून तिचे संरक्षण होईल. रंग, धुळ आणि उष्णतेचा सामना तुमच्या त्वचेला करावा लागणार आहे. त्यामुळे,यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. चेहरा, मान, हात आणि रंग लागेल अशा शरीराच्या अन्य सर्व भागांना नीट लोशन लावा.

शिफारसपात्र उत्पादने:

नारळाचे तेलरंगांना अटकाव करण्यासाठी नारळाचे तेल वापरा. या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि रंग त्वचेत कमी प्रमाणात झिपरतात. शिवाय, त्वचा आणि केसांवर संरक्षक कवच असल्यास रंग धुवून काढणेही सोपे होते. त्वचेला अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावू शकता.

शिफारसपात्र उत्पादने:

लिप बामनुकसान पोहोचवणाऱ्या सर्व घटकांचा ओठांशी संपर्क येतो. त्यामुळे, ओठांच्या भेगांमध्ये रंग अगदी सहज जातात.चांगल्या दर्जाच्या लिप बामचे ४ ते ५ कोट्स लावून ओठांना नीट घासून घ्या आणि ओठ मऊ व मॉइश्चराइज्ड राहतील, याची काळजी घ्या.

शिफारसपात्र उत्पादने:

हँड क्रीमहोळीमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते हातांची काळजी घेण्याकडे. नखांमध्ये रंग चटकन अडकून बसतात आणि ते काढणं अगदी अशक्य होऊन जातं! नखांमध्ये रंग अडकू नयेत आणि क्युटिकल्सचे नुकसान होऊ नये यासाठी भरपूर हँड क्रीम लावा. नखं लहानच ठेवा. शिवाय, होळीच्या आधी अॅक्रॅलिक किंवा जेल नेल्सचा वापर टाळा.

शिफारसपात्र उत्पादने:

               

शॉवर जेलशरीरावर लागलेले रंग धुवून काढण्यासाठी कोणत्याही तीव्र साबणाऐवजी नैसर्गिक शॉवर जेलचा वापर करा. त्वचेतील नाजूक पीएफ समतोल सांभाळून ठेवायचा आहे. त्यामुळे, अंग घासण्याच्या स्पंज किंवा इतर साधनांचा वापर करतानाही जरा जपून.

शिफारसपात्र उत्पादने:

 

शॅम्पूया त्रासापासून केसांना पूर्णपणे वाचवणे अशक्य आहे. पण, हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी सौम्य कडिंशनिंग असणारा माइल्ड स्वरुपातील शॅम्पू वापरून केसांमधील मॉइश्चर संरक्षित ठेवा. एकाच वेळी सारखेसारखे केस धुवू नका. त्याऐवजी, केस धुण्यामध्ये काही काळाचे अंतर ठेवा. त्यामुळे, त्वचेतून निर्माण होणारे नैसर्गिक तेल धुवून जाणार नाही आणि केस कोरडे होणार नाहीत.

शिफारसपात्र उत्पादने:

 

 

फेस स्क्रब: मृत त्वचा काढून टाकणे आणि बंद झालेली छिद्रे मोकळी करण्यासाठी होळीनंतर दुसऱ्या दिवशी फेस स्क्रब वापरा.चेहऱ्यावर हळुवारपणे गोलाकार लावा. शरीराच्या इतर भागांवरही स्क्रबचा वापर करता येईल. कोमट पाण्याने धुवून घ्या आणि त्यांनतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

 

शिफारसपात्र उत्पादने:

फेस मास्कहोळी झाली की करण्याच्या कामात याचा समावेश होतो. होळीमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर घटकांचा तुमच्या त्वचेशी संपर्क होतो. त्यामुळे, त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक वापरू शकता. त्वचेवर हळुवार मालिश करा आणि मास्क १० ते १५ मिनिटं राहू द्या. मास्कमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल, कमी झालेले माइश्चरायझर पुन्हा निर्माण होईल आणि त्वचेची स्वच्छता होईल. एक-दोन वेळ मास्क लावल्यास त्वचा पुन्हा पुर्ववत होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close