मुंबई

मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय ‘साहित्य सन्मान’  पुरस्काराने सन्मानित 

भिवंडी/ प्रतिनिधी : आजची रणरागिणी कोल्हापूर येथून प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या वतीने युवा कवी मिलिंद जाधव यांना  राज्यस्तरीय २०१९ मधील ‘साहित्य सन्मान’  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साप्ताहिक आजची रणरागिणी दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते यावर्षी युवा कवी मिलिंद जाधव याला  कोल्हापूर गडव्हींग्लज येथे सिनेअभिनेत्री अलका कुबल, संपादिका रेखा पाटील,  डॉ. बी. एस. पाटील. डॉ. दिलीप धानके, पत्रकार महेश धानके, यांच्या हस्ते २०१९ राज्यस्तरीय ‘साहित्य सन्मान’ या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मिलिंद जाधव हा भिवंडी तालुक्यातील पडघा या ग्रामीण भागात राहत असून त्याने पत्रकारिते मधून साठेय महाविद्यालयातून  पदव्युत्तर  पदविका मिळवली असून त्याचा  सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो.  विविध सामाजिक कार्यक्रमातून तो आपल्या कवितेच्या मांध्यमातून तो समाज प्रबोधन  करीत असतो. विविध कवी संमेलनात त्याचा सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता देखील वर्तमापत्रातून प्रकाशित केल्या आहेत.
एवढंच नव्हे तर, एक उत्तम कवी म्हणून देखील त्यांची ओळख आहे.त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तित्वामुळे आणि एक युवा कवी  म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कवी संमेलनात व कार्यक्रमात तो सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतो. त्याच्या कार्याची दखल घेऊन दिनांक ३ फेब्रुवारी १०१९ रोजी कोल्हापूर  गडव्हींग्लज येथे युवा  कवी मिलिंद जाधव याला ‘साहित्य सन्मान’ या राज्यस्तरीय पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या उत्तम  कामगिरी बद्दल  भिवंडीतील पत्रकार संतोष चव्हाण, साठेय महाविद्यालयाचे माध्यम विभाग प्रमुख प्रा. गजेंद्र देवडा, साहित्यिक विजयकुमार भोईर, साहित्यिक जगदेव भटू, अँड प्रज्ञेश सोनावणे, कवी नवनाथ रणखांबे यांनी त्याचे अभिनंदन केले असून  विविध  ठिकाणाहून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close