पुणेस्पोर्ट्स

मिटसॉट तर्फे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या तयारीसाठी कार्यशाळेचे आयोजन

मिटसॉट तर्फे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या तयारीसाठी कार्यशाळेचे आयोजन

पुणे : एमआयटी स्कुल ऑफ टेक्नोलॉजी मॅनेजमेंट (मिटसॉट) तर्फे  स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या तयारीसाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन  शुक्रवारी 8 फेब्रुवारी 2019 रोजी एमआयटी डब्ल्यूपीयु कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5:30  या दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना एक्सप्लोरिंग द वर्ल्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅन्ड स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन असून आहे. या कार्यक्रमाला इन्फोसिसचे प्रिन्सिपल कन्सल्टंट नरेंद्र वैशंपायन व कॉग्निझंटचे डाटा सायंटिस्ट आणि एआय विभागाचे प्रमुख कौस्तुभ लातूरकर हे बीजभाषण करतील. या कार्यशाळेदरम्यान स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सर्वसमावेशक अभिनवता या विषयावर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिदं पांडे यांनी दिली.
डॉ.मिलिंद पांडे म्हणाले की,भारताला भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याकरिता विद्यार्थ्यांनी व तरूण पिढीने उपाययोजनांचे भाग बनावेत या केंद्र सरकारच्या प्रयत्नाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थ्यांनी स्मार्ट हॅकॅथॉनसाठी कशा प्रकारे तयार राहावे हा या कार्यशाळेमागचा हेतू आहे.हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे .
Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close