पुणे

ब्रिटिश कौन्सिल तर्फे आयइएलटीएस अभ्यासक्रमाचे आयोजन

ब्रिटिश कौन्सिल तर्फे आयइएलटीएस अभ्यासक्रमाचे आयोजन

पुणे : ब्रिटिश कौन्सिल तर्फे २३-२४ आणि ३०-३१ मार्च २०१९ या तारखेस पुण्यात आयइएलटीएस या अभ्यासक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथील ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी येथे  सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान केले आहे.  हा अभ्यासक्रम विषेशतः विद्यार्थी आणि युवा व्यावसायिकांसाठी असून या क्लासचे शुल्क ११,००० रुपये आहे. 
विद्यार्थ्यांना आणि आयईएलटीएस परीक्षा देऊ इच्छिणाऱ्याना परीक्षेत मूल्यांकन केली जाणारी ४ कौशल्ये जसेकी वक्तृत्व, ऐकणे, वाचणे आणि लेखन करणे  याबद्दल शिकवण्यात येणार आहे. प्रत्येक बॅचमध्ये २० विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल, यामध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष असेल तसेच परीक्षेचा प्रत्येक विभाग कसा हाताळावा याबद्दल सल्ला देण्यात येणार आहे,  याचबरोबर विद्यार्थ्यांना  इंग्रजी व्याकरण, उच्चारण आणि शब्दावली कशी उत्कृष्टरित्या विकसित करता येईल याचा अभिप्राय शिक्षकांकडून मिळेल. या कोर्स द्वारे  नवीनतम सहित्य देखील दिले जाणार आहे ज्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना परीक्षेतील विविध प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
सहभागी लोकांना  उपस्थित राहण्यासाठी ब्रिटीश कौन्सिल तर्फे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
नाव नोंदणी साठी संपर्क: ०२०-६७४९५३०७
सीट मर्यादित आहेत आणि लवकर अर्ज करणाऱ्यांना नोंदणीदरम्यान प्राधान्य देण्यात येईल.
Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close