पुणे

बीएनसीएच्या प्राध्यापक-विद्यार्थिनींनी साकारली महर्षी कर्वे पुतळ्याची कलात्मक मेघडंबरी

देशात प्रथमच डिजिटल आर्किटेक्चर तंत्रज्ञानाचा सर्वांगीण वापर

बीएनसीएच्या प्राध्यापक-विद्यार्थिनींनी साकारली महर्षी कर्वे पुतळ्याची कलात्मक मेघडंबरी

देशात प्रथमच डिजिटल आर्किटेक्चर तंत्रज्ञानाचा सर्वांगीण वापर

 पुणे : नुकत्याच उद्घाटन झालेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा शुभ्र दिव्यांनी हिर्‍यासारखा चमकणार्‍या मेघडंबरीसह असणारा पुतळा आता पुणेकरांच्या एक आश्चर्याचा विषय बनला आहे. त्यासाठी देशात प्रथमच डिजिटल आर्किटेक्चरचा सर्वांगीण वापर करण्यात आलेला आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) प्राध्यापक व विद्यार्थिनींनी त्याचे डिझाईन व उभारणी केली आहे. पुतळा उभारणीसाठीच्या या कामात पुणे महापालिकेने एखाद्या शिक्षण संस्थेच्या समन्वयातून साधलेली ही पहिलीच घटना आहे.

बीएनसीएसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्राचार्य डॉ. कश्यप यांनी सांगितले. ते म्हणाले की, संपूर्ण भारतीय उपखंडात डिजिटल आर्किटेक्चर शिकवणारे व त्यासाठी लागणारे थ्रीडी प्रिंटिंग मशीन, रोबोटिक आर्म अशा अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणारे आमचे एकमेव महाविद्यालय आहे. जगात चीनने या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. अण्णांच्या (महर्षी कर्वे) पुतळ्यासाठी बीएनसीएने पुढाकार घेऊन याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रतीकात्मक मेघडंबरी उभारून त्यांना आदरांजली वाहू शकलो. यासाठी आमच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम अनमोल आहेत. हे काम केवळ पुणेकरांच्याच नव्हे तर आकिर्टेक्चर क्षेत्रात देशातील सर्वांच्यापुढे आदर्श मापदंड निर्माण करणारे ठरेल.

महर्षी कर्वे पुतळ्याच्या मेघडंबरीसह 27 फूट उंच उभारणीच्या कामात  बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली व डिजिटल आर्किटेक्चर विभागाच्या प्रमुख प्रा.धनश्री सरदेशपांडे यांच्या सहकार्यातून हे काम प्रा. स्वप्निल गवांदे यांनी साकारले. यासाठी प्रा. गवांदे यांचा सत्कार महापौर मुक्ता टिळक यांनी केला. या कामात आर्किटेक्ट आनंद खैरनार तसेच बीएनसीएच्या विद्यार्थिनी खुशबू अगरवाल, स्नेहा येरूनकर, विनिता वाघ, सानिया भामरा, मुग्धा गांधी, नेत्रा मेदनकर, राधा मल्लावत तसेच राजेश पवार या विद्यार्थ्यांचे योगदानही आहे.

महर्षी कर्वे पुतळ्याचा मेघडंबरीसाठी लागणारे डिजिटल आर्किटेक्चरच्या तंत्रज्ञानासाठी लागणारे संशोधन बीएनसीएच्या फॅब्रिकेशन प्रयोगशाळेत झाले. यासाठी गणित तसेच संगणकीय प्रोग्रामिंगची गरज असते, असे या कामाचे प्रमुख प्राध्यापक गवांदे यांनी सांगितले. ते म्हणाले की, एखाद्या कल्पवृक्षासारखा बहरलेल्या या मेघडंबरीच्या कामात भौमितिक  900 त्रिकोण  व 150  षटकोनांचा वापर करण्यात आला असून त्या कामासाठी एकंदर 3,600 जोड देण्याचे जिकरीचे काम होते. त्यासाठी लोखंडाचे आकार लेझर किरणांनी कापून फॅब्रिकेशनच्या सहाय्याने ते जोडण्याचे कामही आम्ही स्वयंपूर्णपणे केले आहे. या त्रिमितीय 17 फूट उंचीच्या कल्पवृक्षावर चमकणारी 150 एलईडी दिवेही अत्यंत कलात्मकपणे बसवण्यात आले आहेत. यामधून अण्णांच्या क्रांतिकारी कार्याचे हिर्‍यासारखे चमकणारे पैलू दिसावेत अशी यामागची आमची संकल्पना आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close