पुणे

बजेट हाऊसिंगच्या क्षेत्रात रोहन बिल्डर्सचे पदार्पण

ताथवडे येथील ‘रोहन अनंता’ या बजेट हाऊसिंगमधील पहिल्या प्रकल्पाची घोषण

बजेट हाऊसिंगच्या क्षेत्रात रोहन बिल्डर्सचे पदार्पण


ताथवडे येथील ‘रोहन अनंता’ या बजेट हाऊसिंगमधील पहिल्या प्रकल्पाची घोषण
पुणे  : बांधकाम क्षेत्रातील आपले दर्जेदार डिझाईन आणि अत्युच्च दर्जाचे बांधकाम यांसाठी ओळखले जाणारे रोहन बिल्डर्स (इंडिया) प्रा. लि. आता बजेट हाऊसिंगच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. त्यांचा बजेट हाऊसिंगमधील मुंबई बंगळूरू महामार्गाजवळ असलेल्या ताथवडे येथील ‘रोहन अनंता’ हा पहिला प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या भेटीला येत असल्याची अधिकृत घोषणा रोहन बिल्डर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुहास लुंकड यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या वेळी संचालक मिलिंद व संजय लुंकड, दीपक भटेवरा आणि अभिषेक भटेवरा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुहास लुंकड म्हणाले, “वाढते शहरीकरण, रोजगारासाठी जवळच्या भागातील नागरिकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर आदी बाबी लक्षात घेत बजेट हाऊसिंगची मागणी वाढत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी ही बाब प्रोत्साहन देणारी असून याद्वारे आम्ही देखील मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. विशेष म्हणजे आमचे बजेट हाऊसिंगच्या संदर्भात असलेल्या प्रकल्प हे इतर प्रकल्पांप्रमाणेच इतर सोयीसुविधांनी परिपूर्ण असे असतील. त्यामुळे ग्राहकांना बजेट हाऊसिंगच्या क्षेत्रातही उच्च दर्जाच्या सेवेचा अनुभव घेता येईल.’’

पुणे बंगळूरू बायपास येथील ताथवडे मधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ आम्ही हा ‘रोहन अनंता’ (महारेरा नोंदणी क्रमांक पी ५२१०००१९६६४, पी ५२१०००१९६७८) प्रकल्प सुरु करीत असून याबरोबर नजीकच्या भविष्यात बजेट हाऊसिंगच्या क्षेत्रात रोहन बिल्डर्स आणखीही प्रकल्प हाती घेईल. ‘रोहन अनंता’ हा प्रकल्प एकूण आठ एकर परिसरात पसरलेला असून त्यामध्ये ११ मजल्यांच्या १२ इमारतींचा समावेश आहे. यामध्ये २ मजली पार्किंगचे सुविधा देखील देण्यात आली आहे. प्रकल्पातील १ बीएचके सदनिका (३३७-४१० चौरसफूट) ही सुमारे २७ लाखांपासून तर २ बीएचके (६३६- ७५८ चौरस फूट) सदनिका ही रुपये ४९ लाखांपासून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल. सदर प्रकल्पात एकूण १ हजारांहून अधिक सदनिका असून त्यापैकी ३४० सदनिका आता विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकल्पासाठी सर्व आर्थिक बाबींसाठी होम लोनची आवश्यक ती सुविधा देखील पुरविण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकल्पात जलतरण तलाव, क्लब हाऊस, व्यायामशाळा, पार्टी लॉन याबरोबरच बास्केटबॉल कोर्ट, नेट क्रिकेट पीच, टेनिस कोर्ट, स्क्वाश कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, लहान मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा परिसर, गप्पा कट्टे इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. याबरोबरच आजपर्यंत रोहन बिल्डर्सची खासियत असलेली विशेष पाहुण्यांसाठीची खोली अर्थात गेस्ट रूम देखील या प्रकल्पात पुरविण्यात आली आहे. याबरोबर नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेल्या महिलांच्या दृष्टीने पाळणाघराची सुविधा देखील या प्रकल्पात करण्यात आली असल्याचे या वेळी संजय लुंकड यांनी नमूद केले.

रोहन बिल्डर्स विषयी – 

बांधकाम क्षेत्रात १९९३ पासून असलेले रोहन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. आपल्या उच्च दर्जाच्या निवासी बांधकामासाठी ओळखले जातात. बांधकाम क्षेत्राबरोबरच पायाभूत सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रातील बांधकाम उभारणीमध्येही त्यांचा हातखंडा आहे, आज पर्यंत संपूर्ण देशभरात तब्बल १५ दशलक्ष स्केअर फूटहून अधिक जागेवर त्यांनी बांधकामे केली असून उत्कृष्ट दर्जाची सेवा आणि प्रकल्पाचे वेळेत हस्तांतरण यासाठी ते ओळखले जातात. आजपर्यंत आपल्या ५० हून अधिक प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल १० हजारांहून अधिक ग्राहकांना त्यांनी आपली सेवा दिली आहे. बांधकाम क्षेत्रातील आपल्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे. यामध्ये सातत्याने गेल्या १० वर्षांपासून त्यांना क्रिसिल मानांकनामध्ये डीए २+ ने गौरविण्यात आले आहे.

रोहन बिल्डर्समधील ३० टक्के सदनिकांची विक्री ही आधीच्या ग्राहकांनी इतरांना सांगितलेल्या अनुभवांवरून होते आणि ही गोष्ट संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. याशिवाय इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टिंग क्षेत्रात देखील कंपनीची घोडदौड सुरु असून आजपर्यंत भारत व भूतानमध्ये या अंतर्गत १५८ प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. याबरोबर भारत पाकिस्तानला जोडलेल्या अमृतसर वाघा राष्ट्रीय महागार्ग १, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची शहरे जोडणारे महामार्ग, शहरांतर्गत भुयारी मार्ग अशी एकूण ८०० किमी पेक्षा जास्त रस्त्यांची बांधणी देखील रोहन बिल्डर्स यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close