पुणे

पुण्यामध्ये पहिले पाळीव व इतर प्राण्यांसाठी नेत्र चिकित्सालय सुरू

विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक तर्फे पाषाण येथे द आय वेट क्लिनिक सुरू

विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक तर्फे पाषाण येथे द आय वेट क्लिनिक सुरू

पुण्यामध्ये पाळीव व इतर प्राण्यांसाठी पहिले नेत्र चिकित्सालय सुरू

 पुणे : भारतात पशू आरोग्य सेवेमध्ये जरी सुधारणा होत असली तरी, वेट ऑप्थॉल्मोलॉजी केंद्रासारख्या खास युनिट्सची आपल्या देशात अत्यंत आवश्यकता आहे. विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक तर्फे पुण्यात पहिले पाळीव व इतर प्राण्यांसाठीचे ऑप्थॉल्मोलॉजी स्पेशालिटी क्लिनिक आणि ऑपरेशन थिएटर द आय वेट हे बाणेर – पाषाण लिंक रोड येथे लवकरच सुरू होत आहे.

या क्लिनिकमध्ये मांजरी, कुत्रे, घोडा आणि इतर पाळीव प्राण्यांना वैद्यकीय सेवांबरोबरच शस्त्रक्रिया सेवा देखील प्रदान केली जाईल. यामध्ये डोळ्यांची घ्यावयाची काळजी, डोळ्यांची शस्त्रक्रियेबद्दल सल्ला, मोतीबिंदू शस्त्रक्रिया याबरोबर तबेल्याला भेट देऊन घोड्यांच्या बाबतीतील दुर्मिळ व गुंतागुंतीची परिस्थिती हाताळणे आणि अशा बर्‍याच गोष्टींचा समावेश असेल.

हे क्लिनिक आधुनिक उपकरणे, तपासणी प्रक्रिया आणि प्रशिक्षित कर्मचारी यांनी सज्ज आहे. ही माहिती विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या संस्थापिका आणि पशुनेत्र तज्ञ डॉ.कस्तुरी भडसावळे यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना डॉ.कस्तुरी भडसावळे म्हणाल्या की,भारतात पाळीव प्राण्यांसाठी वैद्यकीय सुविधा सर्वत्र उपलब्ध असल्या तरी सुपर स्पेशालिटी मेडिकल सेवा जसे की नेत्र चिकित्सा याची गरज आहे. पाळीव प्राणी आज फक्त सहकारी राहिलेले नसून कुटुंबाचा सदस्य झाले आहेत. शहरी भागातील विभक्त कुटुंब पद्धती आणि वाढत्या कमाईमुळे लोक आपल्या पाळीव प्राण्यांसाठी अधिक प्रगत तपासणी व निदान पद्धती तसेच सेवांची मागणी करीत आहेत. कारण ते त्यांच्या इतर घरातल्या मंडळींप्रमाणे त्यांच्या पाळीव प्राण्याशी देखील भावनिकरित्या जोडलेले असतात आणि त्यांच्यासाठी उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता ते आग्रही असतात. पुणे हे एक सुंदर शहर आहे जेथे अनेक बंगले,रो हाऊस व सदनिका आहेत ज्यात अनेक पाळीव प्राणी राहतात आणि नागरिक त्यांच्या पाळीव प्राण्यांविषयी तेवढेच भावनिक आहेत आणि म्हणूनच पाळीव प्राण्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल आणि जोखमीचे घटक ज्यामुळे डोळ्यांचे आजार उद्भवण्याची  शक्यता असते याबद्दल जागरुक असणे गरजेचे आहे. आय वेट क्लिनिक देखील पाळीव प्राण्याच्या डोळ्यांच्या आजाराबद्दल आणि घ्यायच्या काळजीबद्दल कार्यशाळेचे आयोजन करेल.

पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त,घोडे,पक्षी तसेच प्राणीसंग्रहालयातील प्राणी यांच्यासाठी देखील नेत्रचिकित्सा सेवा प्रदान करणे आवश्यक आहे. असे देखील त्या म्हणाल्या.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close