पुणेस्पोर्ट्स

पुण्यात ज्युनिअरथॉनला उत्सफूर्त प्रतिसाद

पुण्यात ज्युनिअरथॉनला उत्सफूर्त प्रतिसाद

 
पुणे : मुंबईमध्ये चार यशस्वी सत्रांनंतर ज्युनिअरथॉन या 15 वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या मॅरेथॉन व फिटनेस कार्निव्हल पुण्यात उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे.या ज्युनिअरथॉनमध्ये 1500 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता.
लक्ष्मी लॉन्स,मगरपट्टा सिटी येथून फ्लॅग ऑफ करण्यात आलेली ज्युनिअरथॉन चार विविध गटांत घेण्यात आली होती. या चार गटांमध्ये ओपनर्स (0.5 किमी अंतर-5 ते 8 वयोगटातील एक मूल व एक पालक),बिगिनर्स (1 किमी अंतर-5 ते 11 वर्षे),अ‍ॅमॅच्युअर्स (2 किमी अंतर-वयोगट 5 ते 13 वर्षे) आणि प्रोज (4 किमी अंतर – वयोगट 11 ते 15 वर्षे) यांचा समावेश होता. या उपक्रमाला अपोलो हॉस्पिटल कडून सहकार्य मिळाले आहे.या ज्युनिअरथॉनद्वारे लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. ज्युनिअरथॉन पुणेचे आयोजन भावना मेहता यांनी केले.
Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close