पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे – नाशिक-पुणे महामार्गावर चांडोली येथे पिकअप व दुचाकीच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला आहे. अभि पाचारणे (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अनेक दिवसांपासुन पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरु असुन या महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुसरीकडे या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने ही अपघातांची मालिकाच सुरु आहे.

सायंकाळच्या सुमारास अभि पाचारणे हा तरुण राजगुरुनगर वरुन चाकणच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱया  पिकअप गाडीला दुचाकीची जोरदार धडक लागली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close