पिंपरी-चिंचवडपुणे

पिडित रूग्णास आमदार जगतापांची मदत

पिंपरी : मोहम्मद शैख यांना दोन्ही गुडघ्यांचा गंभीर आजार होता. त्यांच्या दोन्ही गिडघ्यामध्ये जवळ्पास ४५ त ५० डिग्रीचा बाक होता. गुडघ्याच्या आतील बाजूस खड्डा पड्ला होता. त्यामुळे त्यांना गूड्घ्याची अवघड अशीशस्त्रक्रिया करायची होती. परंतु, अर्थिक दुर्बलतेमुळे शस्त्रक्रिया करू शकत नव्हते.

त्यासाठी ५ लाखांपर्यंत खर्च होता. तो शैख कुटुंबीयांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. मोहम्मद शैख यांना सर्वांच्या मदतीची गरज होती. त्यासाठी तिने समाजातील दानशूर व्यक्‍तींना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले होते. आशावेळी त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही.

मोहम्मद शैख हे कोकने नगर येथे राहतात. नेमके काय करावे, हे तिच्या कुटुंबीयांना कळत नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी खूप शोध घेतल्यावर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाकडे झेप घेतली. आमदार जगतापांची भेट घेऊन सर्व माहिती सांगण्यात आली. शस्त्रक्रियेचा व उपचाराचा खर्च शैख कुटुंबीयांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे., शस्त्रक्रिया व इतर उपचार यांचा मिळून अंदाजे खर्च ५ लाखांपर्यंत जाणार आहे. अशावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या शिफारसीव्दारे मुख्यमंत्री निधीतून १ लाख रूपये व ट्र्स्ट व्दारे २ लाख रूपेयांची मदत मिळवून दिली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मोहम्मद शैख व डॉ. राहुल बढे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयास भेट दिली. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप कार्यालयाकडून सतीश कांबळे यांनी पाठ्पुरावा घेतला होता.

Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close