पिंपरी-चिंचवड

पावसाळ्या अगोदर शहर खड्डे मुक्त करावे : आ लक्ष्मण जगताप

पिंपरी : शहरामध्ये सर्वत्र खडड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पाऊसामुळे आणि जड वाहतूकीमुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होतात. पावसाळ्यात अस्तित्वातील खड्ड्यांमुळे त्यांचा आकार वाढून खोली वाढते. त्यामुळे वाहन धारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेवून येत्या पावसाळ्या अगोदर संपूर्ण शहर खड्डे मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनास लेखी निवेदनाव्दारे सुचना दिलेली आहे.

शहर विकासाची खूप कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी व आयुक्तांनीही आपल्या कामाची गती वाढवावी. शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात यावी. मंदावणाऱ्या वाहतुकीला गती देण्यासाठी आणि छोटय़ा-मोठय़ा खड्डय़ांमुळे होणारे पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत.

शहरामध्ये विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसून, या खड्ड्यांमुळे अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्थता होती. त्यामुळे शहरातील सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.

शहरात पदपथांबरोबरच काही ठिकाणी रस्ते आणि चौकांमध्ये पेव्हरब्लॉक बसविण्यात आले. अनेक ठिकाणच्या चौकांमध्ये पेव्हरब्लॉक उखडले गेल्यामुळे खड्डे पडले असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांनाही या खड्डय़ांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे चौक खड्डेमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेण्यात यावा.

Show More
Contact Person WhatsApp us
Close