पुणे

पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे

पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे

पुणे : भारताची तिन्ही सैन्यदले सक्षम असून त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते योग्य तो निर्णय घेतील. समाजाने नाही ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये. पाकिस्तानवर भारताने दबाव कायम ठेवला पाहिजे. तसेच पाकिस्तानला एकदा धडा शिकवलाच पाहिजे असा सूर अनुराधा गोरे, सुमेधा चिथडे आणि अश्विनी पाटील या तीन रणरागिणीं व्यक्त केला . निमित्त होते त्यांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल सन्मान सोहळ्याचे.

प्रसिद्ध सूत्रसंचालक राजेश दामले यांच्या तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीरमाता अनुराधा गोरे, सुमेधा चिथडे आणि वीरपत्नी अश्विनी पाटील या रणरागिणींचा एअर मार्शल(निवृत्त)भूषण गोखले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर  राजेश दामले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये या तीन रणरागिणीं आपली सडेतोड मते व्यक्त केली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरच्या अध्यक्षा वासंती मुळे, बेलवलकर हाउसिंगचे संचालक समीर बेलवलकर यावेळी उपस्थित होते.

अनुराधा गोरे या आपल्या तरुण मुलाला वीरमरण आल्यानंतर ,  वीरमाता आणि वीरपत्नींच्या पुनर्वसनाचे काम करतात, सुमेधा चिथडे यांनी सियाचीन येथील सैनिकांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा म्हणून स्वतःचं स्त्रीधन विकून फक्त पैसे उभे केले असे नसून,जगतातील सर्वोच्च रणभूमीवर सियाचिन’ येथे सिर्फ (Soldiers Independent Rehabilitation Foundation) संस्थेच्या सचिव या नात्याने ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील उभारत आहेत. सुमेधा चिथडे यांचा एकुलता एक मुलगा सैन्यदलात अधिकारी आहे. गेली वीस वर्षे सैन्यदलातील परिवारासाठी स्वकमाईतून सुमेधा चिथडे कार्य करत आहेत, तर अश्विनी पाटील यांनी स्वतःच्या पतीला वीरमरण आल्यानंतर मिळालेल्या मदतीतून निपाणी येथे मुलांसाठी शाळा सुरू केली आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एम.ए पर्यंत शिक्षण देखील घेतले.

पुलवामा हल्यानंतर निर्माण झालेल्या भारत पाकिस्तान दरम्यान  तणावाबाबत बोलताना अनुराधा गोरे म्हणाल्या, भारत पाकिस्तान दरम्यान नक्की काहीतरी होईल असे वाटते. युद्धाची सुरुवात पाकिस्तान करेल आणि त्याचा शेवट भारत करेल. भारताने पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. तसेच पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला पाहिजे. काश्मिरमध्ये साखर, मीठ असे काहीच तयार होत नाही. फुटीरतावाद्यांना धडा शिकवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशा वस्तू पाठवनेच बंद केले पाहिजे.

सुमेधा चिथडे म्हणाल्या, आपली तीनही सैन्यदले सक्षम आहेत. त्यांच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. नको ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये.

अश्विनी पाटील म्हणाल्या, सैनिकांचा विचार केला पाहिजे. उंदराने एकदा कुरतडले आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर तो सारखाच कुरतडत राहतो. त्यामुळे त्याचा बिमोड केलाच पाहिजे. तसा पाकिस्तानचा एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे.

भूषण गोखले म्हणाले, भारताने पहिल्यांदा पाकिस्तानात आत जाऊन बागलकोट येथे हल्ला केला. दहशदवादाचे जिथे प्रशिक्षण दिले जात होते तिथेच हा हल्ला करण्यात आला. या हल्यात कितीजण ठार झाले याचा आकडा मागितला जात आहे. परंतु, शत्रूराष्ट्राला मेसेज मिळणे महत्वाचा असतो. तो पाकिस्तानला मिळाला आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मुत्सदेगीरीने पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. अजूनही बागलकोट आणि इतर ठिकाणी मिडीयाला जाऊ दिले जात नाही. पाकिस्तान कोंडीत सापडला आहे. यापूर्वी पाकिस्तान नागरीकांना त्रास नको म्हणून भारत हल्ले करत नव्हता मात्र, आता सुरुवात झाली आहे. पाकिस्तानची लोकसंख्या वाढत आहे. तर पाकिस्तानातील कोरडेपणा वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी पंजाब व हरियानात वळवले पाहिजे असे ते म्हणाले. भारताने पाकिस्तान विरोधात सर्व तऱ्हेचे बाण सोडले आहेत.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close