पुणे

नंदकिशोर माटोडे यांची आयएसएचआरएई पुणे च्या अध्यक्षपदी निवड

नंदकिशोर माटोडे यांची आयएसएचआरएई पुणे च्या अध्यक्षपदी निवड

पुणे : नंदकिशोर माटोडे यांची इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेशन अ‍ॅन्ड एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी 2019-20 साठी निवड करण्यात आली आहे.त्यांचा व त्यांच्या मंडळाचा पदग्रहण समारंभ हॉटेल रामी ग्रँड येथे 22 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे.नंदकिशोर माटोडे यांना या क्षेत्रात 19 हून अधिक वर्षांचा समृध्द व दीर्घकालीन अनुभव असून ते सध्या व्होल्टास लि.या आघाडीच्या कंपनीमध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.नंदकिशोर माटोडे यांच्या संचालक मंडळामध्ये विरेंद्र बोराडे (सचिव),सतिश मेनन (खजिनदार) व दीपक वाणी (प्रेसिडेंट इलेक्ट) यांचा समावेश असेल.

आयएसएचआरएई पुणे चॅप्टर यावर्षी आपला रौप्यमहोत्सव साजरा करीत असून पदग्रहण समारंभाला 25 माजी अध्यक्ष उपस्थित राहतील.या कार्यक्रमामध्ये एनव्हायरमेंटल कंट्रोल सिस्टिम अ‍ॅन्ड टनेल व्हेंटीलेशन सिस्टिम फॉर अंडरग्राऊंड मेट्रो – अ पुणे परस्पेक्टीव्ह या तांत्रिक सत्राचे आयोजन केले असून व्होल्टास लि.मधील तज्ञ जयंत देशपांडे मार्गदर्शन करतील.

यावर्षी आयएसएचआरएई पुणे चॅप्टरची संकल्पना ही सर्व्हिंग द सोसायटी विथ न्यू एंथूझियाझम इन द मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅन्ड रायझिंग स्टार चॅप्टर ऑफ आयएसएचआरएई कम्युनिटी आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close