मुंबई

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व मतभेद विसरून एकजुटीने सरकार आणि भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी उभे राहा : रामदास आठवले

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व मतभेद विसरून एकजुटीने सरकार आणि भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी उभे राहा : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई :  काश्मीरमधील पुलवामा जवळच्या अवंतीपुर मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर  झालेल्या भ्याड  अतिरेकी हल्ल्यात 44 जवान  भारतीय शहिद झाले. या  भ्याड निंदनीय  हल्ल्याचा तीव्र निषेध करून शहिद जवानांना भावपुर्ण आदरांजली रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी वाहिली. शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपार ची लढाई लढली पाहिजे.  आमच्या भारतीय सैन्यामध्ये एवढी ताकद आहे की पाकिस्तानशी युद्ध झाले तर  काश्मीर तर आपल्या ताब्यात  राहीलच मात्र सर्व पाकिस्तान आम्ही ताब्यात घेऊ असा ईशारा  ना. रामदास आठवले यांनी दिला.
 सुमन नगर  प्रियदर्शिनी सर्कल चेंबूर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करणाऱ्या जाहीर सभेचे आयोजन रिपाइं तर्फे करण्यात आले होते. त्यात ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर आयोजक अशोक जाधव; सौ.वनिता वाघमारे;
रिपाइंचे प्रवक्ते अविनाश महातेकर ;गौतम सोनवणे;सिद्धार्थ कासारे;विवेक पवार कांतिकुमार जैन; किसन रोकडे; अमर कसबे; ऍड. अभयाताई सोनवणे;बाळ गरुड;  तेजस्विनी रोकडे;शकुंतला सरोदे; रावसाहेब सातपुते ; हेमंत रणपिसे  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सीमेपलिकडे असलेल्या अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी ; देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी यावेळी केले.
 दहशतवादी हल्ल्यासारख्या  प्रसंगात देश एकसंघपणे भारतीय सैनिकांच्या पाठीशी उभा राहतो. सैन्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी तसेच शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे. आपण प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहोत ही शिकवण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली आहे त्यामुळे या प्रसंगात रिपब्लिकन पक्ष भारतीय सैन्याच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीर उभा आहे. पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्यदलाच्या आणि भारत सरकार च्या पाठीशी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकजुटीने उभे राहूया असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. पुलवामा दहशवादी हल्ला झाल्यानंतर  रिपाइं च्या वतीने नियोजित कार्यकर्ता मेळावे रद्द करून कुर्ला येथे मेळाव्याचे रूपांतर  दहशतवादी हल्ल्याच्या  निषेधासाठी आणि या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करणाऱ्या सभेत झाले. यावेळी मोठया संख्येने रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.
  मानखुर्द नाका मानखुर्द रेल्वे स्टेशन जवळ केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दहशवादी हल्ले घडविणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध निषेध आंदोलन करीत पाकिस्तान चा ध्वज जाळण्यात आला. यावेळी रिपाइं चे रवी गायकवाड ;  कामु पवार ; काका खंबाळकर;  संजय डोळसे संतोष लाड; महावीर सोनवणे; आदी अनेक रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close