पुणे

चितेच्या निखाऱ्यावर प्रकाशमान झाल्या कविता

जेजुरीच्या स्मशानभूमीत साजरे झाले विद्रोही कविसंमेलन

पर्यावरण प्रेमी व्याख्याते आणि कवींचा झाला स्मशानात सन्मान

अनोखा वाढदिवस साजरा करणारा कवी 

तर  प्रख्यात मराठमोळ्या कवी यशवंत सावंत यांच्या स्मृतींना मिळाल उजाळा                                              पुरंदर (प्रतिनिधी ) : स्मशाना   नेहमी असते शांतता तर अघोरी साधू संन्याशाचे वास्तव्य असते अखेरचा निरोप देणाऱ्या या मसण वाट्यात कधी भजन कीर्तन चा आवाज येत असतो दुख आणि मोक्षाची वाट मानणाऱ्या या भूमीत मात्र शुक्रवारी  खरोखरच  स्मशानातील चितेच्या निखाऱ्यावर   प्रकाशमान झाल्या विद्रोही कविता.

धर्म अर्थ आणि शास्त्र आणि विद्रोह असलेल्या जेजुरीत गेल्या काही वर्षात एका विद्रोही कवीने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यास सुरवात केली असून यंदा हि जेष्ठ  मराठ मोळे कवी  कै यशवंत सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्रोही कवी संमेलन भरवण्यात आले त्यास जेजुरी रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या अनोख्या विद्रोही कवी सम्मेलनात ज्यांनी आपल्या मानवी सेवाभावी वृत्तीतून मसण वाट्यात  ही पर्यावरण सेवेतून स्मशान भूमीचा चेहराच  बदलून टाकला असे जेष्ठ समाजसेवक अरुणअण्णा बारभाई आणि युवा  विद्रोही पत्रकार आणि शिवव्याख्याते निलेश जगताप यांना फुले पगडी आणि कार्य्संमान पत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी प्रमुख कवी म्हणून पाचारण करण्यात आलेले नामवंत विद्रोही कवी आकाश सोनवणे ,नितीन चंदन शिवे  हनुमंत चांदगुडे ,ह्र्दय मानव ,सुमित गुणवंत .सागर काकडे .अनिल दीक्षित रवींद्र कांबळे   हिंदी कवी डॉ  सिह चा सन्मान विद्रोही कवी संमेलन आयोजक श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त कवी शिवराज झगडे .संदीप जगताप पंकज निकुडे  .तसेच माझी नगरसेवक मेहबूब पानसरे ,सतीश गाडगे , सामाजिक कार्यकर्ते  लोकेश सावंत उमेश जगताप जेष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे सुनील लोणकर तानाजी झगडे  यांच्या हस्ते करण्यात आले .आजची सामजिक राजकीय आणि फसव्या बोंदूगिरी ,अंधश्रद्धा या विविध विषयावर प्रहार करणारे भाष्य करणाऱ्या कविता रसिकांच्या अन्त्र्मांचा वेध घेत मान्यवर कवींनी मांडल्या तर आता तरी  संविधान माननाऱ्या  माणसानो जागे व्हा या कविताने खरा विद्रोह केला.

Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close