टेक्नोलॉजीपुणेमनोरंजन

घड्याळाशी आपले भावनिक नाते : भूमी पेडणेकर

* सुप्रसिध्द अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या हस्ते लाँजिन्सच्या रेकॉर्ड कलेक्शनचे अनावरण

घड्याळाशी आपले भावनिक नाते : भूमी पेडणेकर

* सुप्रसिध्द अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या हस्ते लाँजिन्सच्या रेकॉर्ड कलेक्शनचे अनावरण

पुणे : आपले पहिले घड्याळ आपण नेहमीच जपून ठेवतो. माझे सर्वात पहिले घड्याळ माझ्या वडिलांनी दिले होते जे आजही माझ्यासोबत आहे. घड्याळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असते आणि आपल्या अनेक आठवणींचे साक्षीदार असते.म्हणूनच भावनिकरित्या आपण त्याच्याशी जोडलेले असतो,असे मत प्रसिध्द अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी व्यक्त केले.

आघाडीचा स्विस वॉच ब्रँड असलेल्या लाँजिन्सच्या नवीन रेकॉर्ड कलेक्शन चे अनावरण एमजी रोड येथील सिटी पंडोलच्या दालनात भूमी पेडणेकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सीटी पंडोलचे व्यवस्थापकीय संचालक कावस पंडोल उपस्थित होते.

भूमी पेडणेकर पुढे म्हणाल्या की,वक्तशीरपणा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. वेळ ही अचूक हवी आणि कुठेही वेळेवर उपस्थित असणे गरजेचे आहे. प्रत्येक मूडसाठी वेगळी घड्याळे असतात आणि लोकं वेगवेगळ्या प्रकारची आणि आकाराची घड्याळे वापरतात.एका अर्थी घड्याळ हे आपले व्यक्तिमत्त्व दर्शवत असते.

लाँजिन्स ब्रँडबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, लाँजिन्स हा 85 वर्षाची परंपरा असलेला ब्रँड त्याच्या नाजूक आणि उत्कृष्टतेसाठी ओळखला जातो. नवीन आलेली घड्याळे अष्टपैलू आहेत जी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला घालू शकता. हे नवीन कलेक्शन तुमच्या प्रत्येक मूडसाठी बनलेले आहे. भारदस्त, नाजूक, रोज गोल्ड, हिरे जडित अशा सर्व धाटणीची घड्याळे तुम्हाला या कलेक्शन मध्ये उपलब्ध होतील. या नवीन कलेक्शनमधील घड्याळे व्हॅलेंटाईनसाठी भेटवस्तू देण्यास योग्य ठरतील.

हे कलेक्शन म्हणजे सौंदर्य व उत्कृष्टतेचा मिलाफ करण्यात ध्येय आहे. या रेकॉर्ड कलेक्शनमध्ये लाँजिन्सच्या आयकॉनिक टाईमपीससह पुरुष व महिला दोघांसाठी डिझाईन केलेल्या नवीन मॉडेल्सचा समावेश केला आहे. स्टिल केस, हिरे जडित स्टील केस ऑन टू डायल्स,रोझ गोल्ड केस अश्या तीन प्रकारात उपलब्ध असतील. ही मॉडेल्स स्टेनलेस स्टील ब्रेसलेट बरोबरच अ‍ॅलिगेटर स्ट्रॅप मध्ये देखील उपलब्ध आहेत.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close