आंतरराष्ट्रीयटेक्नोलॉजीफायनान्समहाराष्ट्रमुंबई

एटीएम मशीन २०१९ मध्ये होणार बंद?

एटीएम मशीन बंद झाल्यामुळे बेकारी वाढणार

मुंबई : कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (कॅटमी) चेतावणी दिली आहे की, मार्च २०१९ पर्यंत देशातील निम्मे एटीएम मशीन बंद होणार आहेत. त्यामुळे आता देशातील नागरिकांना पुन्हा बॅंकामध्ये रांग लावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर चलनातील ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या होत्या. बंद झालेल्या नोटा बॅंकेमधून बदलून मिळणार होत्या. त्यामुळे देशातील कोट्यवधी नागएटीएम मशीन २०१९ मध्ये होणार बंद?रिकांना बॅंकामध्ये रांगेत उभे राहावे लागले होते. तासतांस या रांगामध्ये उभे राहिल्यामुळे बऱ्याच नागरिकांची प्रकृती ढासळली होती. उन्हातान्हात उभे राहिल्यामुळे लोकांना चक्कर येत होते. आता हेच दिवस पुन्हा बघायला मिळतील की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एटीएम मशीन का बंद होणार?

कॅटमीने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०१९ पर्यंत देशातील निम्मे एटीएम मशीन बंद होणार आहेत. एटीएम मशीनच्या अपग्रेडेशनसाठी हे मशीन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहित कॅटमीने दिली आहे. कॅटमीच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, भारतात तब्बल २.३८ लाख एटीएम मशीन आहेत. यामधील १.१३ लाख एटीएम मशीन बंद होऊ शकतात. त्याचबरोबर एटीएम मशीनच्या बंद होण्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि हजारो नोकऱ्यांवरती  परिणाम होणार असल्याची माहिती कॅटमीने दिली आहे.

३ हजार कोटी खर्च

कॅटमीने सांगितले आहे की, एटीएमच्या नवीन कॅश लॉजिस्टिक आणि कॅसेट स्वाइप प्रणालीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला ३ हजार कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर या एटीएम मशीन बंद झाल्यामुळे बेकारी वाढणार असल्याचेही कॅटमीने सांगितले आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close