आंतरराष्ट्रीयमनोरंजनमुंबईशेती

अभिताभ बच्चन उत्तरप्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे ४ कोटींचे कर्ज भरणार

महाराष्ट्रातील अमिताभ बच्चनवरती काही शेतकर्‍यांमध्ये नाराजी

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन यांनी कायमच आपले वेगळेपण जपले आहे. अभिनयातून तर कधी कृतीतून हे वेगळेपण आपण अनुभवलेले आहे. हेच वेगळेपण जपत महानायक अभिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांसाठी जे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अभिमान वाटत आहे. बळीराजाच्या डोक्यावरील ओझं कमी करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल अमिताभ यांनी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी मदत केली आहे. बच्चन यांनी युपीतील १३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटींचे कर्ज भरले आहे. बच्चन यांनी ब्लॉगवर अधिकृतरीत्या याबाबत माहिती शेअर केली आहे. ही माहिती शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, शेतकरी कायम संकटात दिसत आहेत. म्हणून त्यांच ओझं कमी करण्याची इच्छा होती. त्याच प्रेरणेतून हे पाऊल उचललं आहे.

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, गुरुवार (दि. 1) नोव्हेंबर 2018 रोजी 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ट्रीगर वन, ट्रीगर टू आणि ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे जे तालुके दुष्काळ यादीत बसले, त्या 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर ही करण्यात आला आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची असतानाही महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला दुजोरा दाखविला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चनवरती काही शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर धरू लागला आहे.

दरम्यान, महानायक अभिताभ बच्चन यांनी या अगोदर महाराष्ट्रातील ३५० शेतकऱ्यांच कर्ज भरले आहे. आता उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांवर बँकाकडील असलेले ४.०५ कोटींचे कर्ज माफ केले जाणार आहे. अमिताभ यांनी शेतकऱ्यांच हे कर्ज भरण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत ‘ओटीएस : वन टाइम सेटलमेंट’ केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची भेट घेऊन बँकेला पत्र पाठवणार आहेत. यासाठी त्यांनी ७० शेतकऱ्यांना मुंबईत आमंत्रित केलं आहे. तसेच त्यांच्यासाठी रेल्वेचा पूर्ण डब्बा बुक केला आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close